
सामना ऑनलाईन । पाटणा
उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे खासदार निखील कुमार यांचे पक्षाने तिकीट कापल्याने नाराज झालेल्या त्यांच्या समर्थकांनी पक्ष कार्यालयात जोरदार हंगामा केला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारीही झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#WATCH Congress workers create ruckus at party office in Patna, Bihar over denial of ticket to former party MP Nikhil Kumar from Aurangabad parliamentary constituency. Grand alliance has fielded Upendra Prasad of Hindustani Awam Morcha (Secular) as its candidate from Aurangabad. pic.twitter.com/ITwiVHt0ja
— ANI (@ANI) April 4, 2019
बिहारमध्ये भाजप विरोधात काँग्रेस, राजद, हिंदुस्थानी अवाम मोर्चा या पक्षांनी महागठबंधन तयार केले आहे. महागठबंधनच्या जागा वाटपात औरंगाबाद मतदारसंघाची जागा हिंदुस्थानी अवाम मोर्चाला देण्यात आली आहे. त्या जागेवर त्यांच्याकडून उपेंद्र प्रसाद यांना तिकीट देण्यात आले आहे. मात्र काँग्रेसने तिकीट कापल्यामुळे नाराज झालेल्या कुमार यांच्या समर्थकांनी पक्ष कार्यालयात गोंधळ केला. निखील कुमार यांना तिकीट देण्याची मागणी कार्यकर्ते करत होते. यावेळी पक्ष कार्यालयात मोठा गोंधळ झाला व कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाली.




























































