कंटेनर पलटी, घोडबंदर-मुंबई वाहतूक मंदावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
container-accident-on-ghodbunder

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाण्यातील कापुरबावडी पुलावर एक कंटेनर पलटी झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. तब्बल नऊ तासांच्या प्रयत्नांनंतर हा कंटेनर हटवण्यात आला आहे. त्यानंतर या मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली असून संथ गतीने सुरू आहे.

कापुरबावडी पुलावर कंटेनर उलटून रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर ऑईल सांडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पुलाच्या कडठ्यामुळे अडकून पडलेला कंटेनर हटवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.