कोथिंबीर 200 रुपये जुडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी सायंकाळी आवक घटल्याने गावठी कोथिंबिरीने 220 रुपये जुडी एवढा उच्चांकी दर गाठला.

नाशिक बाजार समितीत शनिवारी 58 हजार जुडय़ा इतकी कोथिंबिरीची आवक होती. गावठी कोथिंबिरीला विमान 30, कमाल 100 व सरासरी 70 रुपये दर मिळाला होता. तर हायब्रीडचे दर 30-145-110 रुपये असे होते. एकाच दिवसात रविवारी आवक 14 हजार जुडय़ांनी घटली. ती 44 हजार जुडय़ा इतकी होती. गावठी कोथिंबिरीला विमान 40, कमाल 220 तर सरासरी 75 रुपये दर मिळाला. हायब्रीड कोथिंबिरीचे दर 50-162-65 असे होते.

पितृपक्षात कोथिंबिरीला 182 रुपये असा कमाल दर मिळाला होता. त्यानंतर दरात घसरण होत गेली. मात्र रविवारी आवक घटल्याने दरात सुधारणा झाल्याची माहिती नाशिक बाजार समितीतील सूत्रांनी दिली आहे.