नेल आर्टमधून कोरोनाची जनजागृती; रजनी रंजनचे अनोखे टॅलेंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्याच्या कोरोना काळात लोकांनी कोणती खबरदारी घ्यावी, आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी तसेच लसीकरण याबाबत  रजनी रंजन ही तरुणी नेट आर्टमधून अनोखी जनजागृती करत आहे. रजनी नखांवर वेगवेगळे चित्रमय संदेश साकारते. ‘लस घ्या’ असा संदेश  तिने अंगठय़ावर लिहिला आहे.

पाटणा येथे राहणारी 26 वर्षांची रजनी रंजन नेल आर्टिस्ट आहे. तिने स्वतःच ही कला आत्मसात केली आहे. मागील सहा वर्षांपासून रजनी नेल आर्ट करतेय. तिने विविध विषयांवरील नेट आर्ट केले आहे. नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेदरम्यान तिने विजेत्यांचे अनोख्या आर्टच्या माध्यमातून कौतुक केले होते. रजनीने नखांवर मीराबाई चानू, नीरज चोप्रा यांचे पोर्ट्रेट साकारले होते. पाटणा येथे स्वतःचा नेट आर्ट स्टुडिओ उभारण्याचे रजनीचे स्वप्न आहे.