Ganeshotsav 2021 – ‘लालबागचा राजा’ सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाइन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह संपूर्ण हिंदुस्थानातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान मानले जाणाऱया लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठय़ा संख्येने गर्दी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मात्र मंडळाने गणेशभक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली असून शुक्रवारी राजाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाइन दर्शन सुरू केले जाईल, अशी माहिती मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली. मंडळाच्या अधिकृत वेबसाईट इतर सोशल मीडियाच्या माध्यमांवर हे दर्शन घेता येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने गेल्या वर्षी गणेशोत्सव रद्द करीत आरोग्यउत्सव साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. यंदाचे हे मंडळाचे 88 वे वर्ष असून यंदा मंडळाने 4 फुटांची राजाचा प्रतिपृतीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार मंडळाने यंदा ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली. त्याबरोबरच कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून देखावा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी मंडळाच्या https://www.lalbaugcharaja.com/ या अधिकृत वेबसाईटवर भेट देण्याचे आवाहन अध्यक्ष कांबळे यांनी केले.