मध्य प्रदेशला चाललेला अख्खा ऑक्सिजन टँकर चोरला, उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील कोरोना संकटात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. अशातच उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे झारखंडहुन मध्ये प्रदेशला चाललेला ऑक्सिजन टँकर उत्तर प्रदेशमध्ये काही अज्ञात इसमांनी चोरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा ऑक्सिजन टँकर वाहन चालकाला (UP 78BT 5404) मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात पोहोचवायचा होता. या टँकरची शेतवची लोकेशन लखनऊ जवळ होती. मध्य प्रदेशमध्ये जात असताना लखनऊमध्ये या टँकरवर काही अज्ञातांनी हल्लाकरून हा टँकर चोरला, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या टँकरच्या चालकाने एक ऑडियो पाठवला आहे. ज्यात त्याची शेवटची लोकेशन लखनऊ असल्याचे कळले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्येही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता, बोकारोहून रेल्वेमार्गे ऑक्सिजन टँकर लखनऊ आणण्यात येत आहेत. रेल्वेने म्हटले आहे की, ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ गाड्यांच्या प्रत्येक टँकरमध्ये सुमारे 16 टन ऑक्सिजन वाहून नेणे शक्य आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याची ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी केंद्राशी चर्चा सुरु आहे.