
मुंबईत गुरुवारी 403 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली. मुंबईत आतापर्यंत 7 लाख 12 हजार 100 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
काल 340 नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या 7 लाख 35 हजार 505 झाली असून, मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी 1 हजार 405 दिवसांवर आलाय.
सध्या अॅक्टीव 5201 रुग्ण असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. गुरुवारी कोरोनामुळे 13 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा 15 हजार 808 वर पोचला आहे.



























































