Corona – गर्दी आणि मोकाटवीरांवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून वेगवेगळे उपाय वापरात आणले जात आहेत. लोकांनी जीवनावश्यक वस्तूही घेत असताना विशिष्ट अंतरावर उभे राहून घेतले पाहिजे अशी सूचना ही दिली जात आहे. लोणंद शहरात अजूनही काही विनाकारण बाहेर पडून आदेशाचा भंग करीत आहेत. त्यासाठी आता नवा पर्याय म्हणून लोणंद पोलिसांनी वापरात आणला आहे. लोणंद शहरात गर्दी वर नियंत्रण ठेवण्यासाठी लोणंद पोलिसांकडून ड्रोन कॅमेराचा वापर करण्यात येत आहे.

विनाकारण रस्त्यावर आपली वाहने घेऊन येणाऱ्यांवर ड्रोनच्या फुटेज चा वापर करून कारवाई करण्यात येणार आहे.तरी सर्वांनी याबाबत खबरदारी घ्यावी, अशी माहिती लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस संतोष चौधरी यांनी दिली. लोणंद शहरात वेगवेगळ्या स्वरूपातून मदत कार्य सुरू असताना ड्रोन कॅमेराच्याच्या बाबतीतही तसेच आहे. शहरात या ड्रोन कॅमेराचा वापर करण्यासाठी हरदीप फोटो स्टुडिओचे हरदीप गोळे यांनी विनामूल्यही सेवा पोलीस प्रशासनासाठी उपलब्ध करून दिली आहे. संकटाच्या काळात पोलीस प्रशासनावरील ताण कमी करण्यास हा ड्रोन कॅमेरा उपयुक्त ठरत असल्याने ड्रोनच्या सेवेबद्दलही लोणंद शहरातून विशेष कौतुक होते आहे.