कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना सांगून जिल्हा परिषदेच्या शाळा झाल्या बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शासनाने सोमवारी ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय परिपत्रकाद्वारे घेतला होता. या निर्णयानंतर आज जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना बोलून कोरोना संसर्ग टाळण्या संदर्भात मार्गदर्शन करून शाळांना सुट्टी दिली.

राज्यातील शहरी भागातील शाळा बंद करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी शासनाने घेतला होता यामध्ये ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश नव्हता त्यामुळे या शाळा सुरू राहतील अशी माहिती समोर आली होती. मात्र ग्रामीण भागात शैक्षणिक संस्थेवर अध्यापनाचे काम करणारे बहुतांशी शिक्षक प्राध्यापक हे शहरात राहून अप-डाऊन करतात त्यामुळे कोरोना संसर्ग खेड्यापर्यंत सहज पोहोचू शकेल अशी शक्यता निर्माण झाली होती. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्यामुळे सोमवारी 16 मार्च रोजी राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शैक्षणिक संस्था 31 मार्च पर्यंत बंद करण्याचा शासन निर्णय काल जारी केला होता. त्यामुळे आजपासून सर्व शाळा महाविद्यालय बंद राहील अशी अपेक्षा होती.

दरम्यान, आज सकाळी नेहमीप्रमाणे शाळेची घंटा वाजली परिपाठाच्या मैदानावर शाळेतील शिक्षकांनी देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना संसर्गाची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच हा संसर्ग कसा टाळता येऊ शकतो यावर उपाययोजना सांगितल्या. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी हात धुऊन घ्यावे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये ताप किंवा खोकला यासारखे लक्षणे दिसू लागतात तात्काळ उपाययोजना म्हणून शासकीय रुग्णालयात जावे गर्दीच्या ठिकाणी फिरत असताना तोंडावर मास्कचा वापर करावा आदी विद्यार्थ्यांना दिल्यानंतर शाळा बंद केल्या विद्यार्थ्यांनी 31 मार्च पर्यंत कुठेही बाहेर फिरायला न जाता घरीच थांबावे तसेच पालकांनी दक्ष राहून काळजी घ्यावी अशी सूचना आज देण्यात आले त्यानंतर शाळा बंद करण्यात आल्या.