
कोरोनाच्या दुसऱया लाटेत दररोज अनेक दिवस 60 ते 70 मृत्यू झाल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली असताना आता मात्र कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंचे प्रमाणही कमी होत आहे. मुंबईत अडीच महिन्यांनंतर आज एकेरी आकडय़ात 7 इतके मृत्यू नोंदवले गेले. याआधी 24 मार्च रोजी 8 मृत्यू नोंदले गेले होते. गेल्या 24 तासांत मुंबईत 673 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने रुग्ण दुपटीच्या कालावधीतही वाढला 543 दिवसांवर गेला आहे.
सक्रिय रुग्णही घटले
मुंबईत रुग्ण बरे होण्याचा कालावधी 95 टक्क्यांवर गेल्याने सद्यस्थितीत केवळ 15,707 सक्रिय रुग्ण राहिले आहेत. तर रुग्णवाढीचा कालावधीही कमी होऊन 0.12 टक्क्यावर आले आहे. दरम्यान, पालिकेच्या माध्यमातून चाचण्या वाढवून उपाययोजना केल्या जात असल्यामुळे रुग्णनोंद घटली आहे. आज एकाच दिवसात 26 हजार 992 चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये केवळ 673 कोरोनाबाधित रुग्ण आढळले.



























































