
राज्याला आज मोठा दिलासा मिळाला असून कोरोना रुग्णांच्या मृत्यूंमध्ये मोठी घट झाली आहे. दैनंदिन रुग्णसंख्याही कमी झाली असून बरे होणाऱया रुग्णांची संख्या आज निदान झालेल्या रुग्णसंख्येच्या दुपटीच्या जवळपास असल्याचे दिसत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत एकूण 4 हजार 869 नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. याबरोबरच आज एकूण 8 हजार 429 इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आज दिवसभरात एकूण 90 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात मृत्यूची संख्या दोन आकडी असली तरीदेखील राज्यातील मृत्युदर मात्र 2.01 टक्क्यांवरच स्थिरावला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण 61 लाख 03 हजार 325 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.65 टक्के एवढे झाले आहे.


























































