राज्यात कोरोना संचारबंदी लागू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून 144 कलम लागू झाले असून पुढील 15 दिवस राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. योग्य कारणाशिवाय कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. राज्यात नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

हे सुरू राहणार

  • पावसाळ्यानिमित्त हाती घेतलेली कामे
  • त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनाकडून सुरू असलेल्या सर्व सेवासुविधा
  • रिझर्व्ह बँकेने अत्यावश्यक म्हणून ठरवलेल्या सर्व वित्तीय सेवा  टेलिकॉम सेवांचे देखभाल-दुरुस्तीचे कामे
  • डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस, माहिती-तंत्रज्ञान सेवा
  • मालवाहतूक, पाणीपुरवठा, शेती क्षेत्रातील सर्व सुविधा
  • धान्याची आयात-निर्यात , त्याचप्रमाणे ई-कॉमर्सच्या अत्यावश्यक सेवांना परवानगी
  • वृत्तपत्र छपाई आणि वितरणास परवानगी
    पावसाळ्यासाठी आवश्यक वस्तू तयार करणारे कारखाने तसेच यासंबंधी कच्चा माल तयार करणारे कारखाने

यावर निर्बंध

  • अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार
  • चौपाटय़ा, उद्याने, मोकळी मैदाने बंद राहणार
  • चित्रपट, मालिका, जाहिरातींचे शूटिंग पूर्णतः बंद
  • शाळा-महाविद्यालये बंद राहणार, केवळ दहावी-बारावीच्या परीक्षांपुरते सुरू करण्यास परवानगी. परीक्षेसाठी येणाऱया कर्मचाऱयांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक
  • लग्नसोहळ्यात केवळ 25 जणांना परवानगी, कर्मचारी वर्गाला कोरोना चाचणी सक्तीची
  • पाचपेक्षा अधिक कोरोना रुग्ण ज्या इमारतीत आढळतील ती इमारत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करणार

रिक्षा–टॅक्सीत 50 टक्के प्रवाशांची मर्यादा

रिक्षात 2, टॅक्सीत एकूण क्षमतेपेक्षा अर्धे प्रवासी म्हणजे 50 टक्के प्रवाशांची मर्यादा घालण्यात आली आहे. बसमध्ये पूर्ण क्षमतेने बसून प्रवास करण्यास परवानगी, स्टँडिंग नाही. खासगी वाहनांना केवळ अत्यावश्यक सेवा तसेच योग्य कारणासाठी वापरण्यास परवानगी असेल.

धार्मिक स्थळी फक्त पूजाअर्चेला परवानगी

धार्मिक स्थळे बंद राहणार, पूजाअर्चा मात्र सुरू राहणार असून या कर्मचाऱयांचे लसीकरण करणे बंधनकारक आहे. कोणत्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रमांना परवानगी नाही.