
कोरोना व्हायरस महामारीने जगभरातील बालाढ्य राष्ट्रांना जेरीस आणले आहे. अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या तंत्रज्ञानाला कोरोनाशी झुंजताना मोठी पराकाष्ठा करावी लागत आहे. जगातील 188 देशांत 13 हजार 598 नागरिकांचा प्राण या कोरोना महामारीने घेतल्याचे समोर आले. जवळपास सव्वातीन लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापुढेही हे संक्रमण सध्यातरी थांबण्याची चिन्हे दिसत नाही. चीनमध्ये तीन दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळला नसला तरी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इटलीत दररोज हजारो नागरिकांचा बळी जात आहे. इराण, फ्रान्स राष्ट्रप्रमुखांनी कोरोना रोखण्यासाठी शक्य तितके प्रयत्न सुरू केले आहे.

























































