#Corona वर्ल्डकपचा ‘हिरो’ कोरोनाला ‘क्लीनबोल्ड’ करण्यासाठी उतरला रस्त्यावर

2168

टी-20 क्रिकेटचा पहिला वर्ल्डकप आणि अंतिम सामना हिंदुस्थान-पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघात. शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आणि समोर मिसबाह उल-हक सारखा सेट फलंदाज. अशावेळी एमएस धोनी याने चेंडू एका नवख्या गोलंदाजाच्या हाती दिला. पहिल्या 2 चेंडूवर 7 धावा दिल्यानंतर संपूर्ण दबाव हिंदुस्थानवर होता.

समोर पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल-हक होता. सामना पाकिस्तानच्या हातात गेला असे वाटत असतानाच मिसबाह उल-हक याने यष्टीमागे षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत गेला मात्र सीमारेषा पार होण्यापूर्वी एस. श्रीसंथ याने झेल पकडला आणि हिंदुस्थानने वर्ल्डकप जिंकला. हिंदुस्थानकडून ते शेवटचे षटक टाकले होते जोगिंदर शर्मा याने. या मॅचमुळे जोगिंदर रातोरात स्टार झाला. परंतु यानंतर तो आंतराष्ट्रीय स्तरावर जास्त खेळताना दिसला नाही आणि त्याला हरयाणा पोलीस खात्यात डीएसपीची नौकरी मिळाली.

टी-20 वर्ल्डकपनंतर त्याची क्रिकेट कारकीर्द संपली मात्र स्पोर्ट कोट्यातून त्याला पोलिसात भरती होण्याची संधी मिळाली आणि आज तो देश सेवा बजावत आहे. जगभरात हाहाकार उडवून दिलेला कोरोना व्हायरस हिंदुस्थानात आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. हा निर्णय आणि लॉकडाऊन यशस्वी होण्यासाठी जोगिंदर शर्मा रस्त्यावर उतरून देशसेवा करत असून लोकांना मदत करत आहे.

जोगिंदर शर्मा हरयाणामध्ये लॉकडाऊन काळात रस्त्यावर उतरलेल्या लोकांना घरी पाठवत आहे. त्याने ट्विट करून लोकांना आवाहन केले आहे की, ‘कोरोना रोखण्याचा सोशल डिस्टनसिंग हाच एकमेव उपाय आहे. चला सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करूया आणि या महामारीचा सामना करूया. कृपया सहकार्य करा. जय हिंद.’

screenshot_2020-03-25-14-43-05-168_com-twitter-android

क्रिकेट कारकीर्द
जोगिंदर शर्मा हिंदुस्थान कडून फक्त 4 एक दिवसीय आणि 4 टी-20 लढती खेळल्या. यात त्याने फक्त 45 बळी मिळवले. मात्र 2007 ला झालेल्या टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात त्याचे शेवटचे षटक नेहमीच क्रीडा प्रेमीच्या लक्षात राहील. या षटकात त्याने दोन बळी घेत हिंदुस्थानला विश्वविजेता केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या