
गायिका कनिका कपूर हिला कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याचं निदान करण्यात आले आहे. हा आजार संसर्गजन्य असून आजारी व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्यालाही तो होण्याची दाट शक्यता असते. आजारी कनिका ही अनेक पार्ट्यांना गेली होती. ती जवळपास 400 जणांना भेटली होती असंही कळतं आहे. विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जात आहे. कनिकावर आरोप आहे की तिने ही तपासणी चुकवून पळ काढला होता.
कनिका कपूरमुळे इतरांना आजाराची लागण होण्याची शक्यता तर आहेच शिवाय तिच्यामुळे कनिका नावाच्या इतर महिलांना फालतूमध्ये त्रास सहन करावा लागतोय. कथालेखिका कनिका धिल्लों हिला कनिका कपूर समजून काही जणांनी वाईटसाईट बोलायला सुरुवात केली. यामुळे सहन कराव्या लागलेल्या मनस्तापामुळे कनिकाला राग आला. तिने वाईटसाईट बोलणाऱ्याची ट्विटरवरच खरडपट्टी काढली. सूरज नावाच्या या व्यक्तीने ट्विट काय केलं होतं ते आधी पाहूयात. त्याने कनिका धिल्लोंला टॅग करून ट्विट केलं होतं, ज्यात त्याने लिहिलं होतं की ‘पसरवलास ना आजार सगळ्यांना! तुम्ही स्वत:ला सेलिब्रिटी म्हणवता आणि असं बेजबाबदारपणे वागता? लाज वाटायला पाहिजे तुला, जेलमध्ये टाकायला हवं’
@KanikaDhillon faila diya na tumne sabko aur apne aap ko celebrity bolte hai aise irresponsible log lanat hai tumpe jail me dalo isko #kanikakapoorcriminal
— Suraj Kumar (@surajjob19) March 20, 2020
यावर कनिकाने त्याला झापताना म्हटलं.
@KanikaDhillon faila diya na tumne sabko aur apne aap ko celebrity bolte hai aise irresponsible log lanat hai tumpe jail me dalo isko #kanikakapoorcriminal
— Suraj Kumar (@surajjob19) March 20, 2020
सर, व्हायरस तुमच्या डोक्यात घुसलाय. प्रत्येक कनिकाला उचलून जेलमध्ये घालाल काय ? नाव सूरज आहे, मात्र डोक्यात अंधार आहे. डोक्यात प्रकाश पाडून घ्या. प्रेम पसरवा, घरात राहा आणि हात साबणाने धुवा!! नमस्ते!
कनिका धिल्लों ही चित्रपटासाठी कथा लिहिते तिने मनमर्जियां आणि जजमेंटल है क्या या चित्रपटांसाठी कथा लिहिली होती. काही दिवसांपूर्वी कनिका धिल्लों अनुष्का शेट्टीमुळे चर्चेत आली होती, त्याचं कारण काय होतं, ते वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. https://bit.ly/3aamhE6
























































