घरात एकट्या असणाऱ्या आजी-आजोबांना युवासेनेचा मदतीचा हात, असा करू शकता संपर्क

yuva-sena

कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरातून बाहेर न पडणं हाच या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र यामुळे दिव्यांगाना आणि खासकरून घरात एकट्या राहणाऱ्या वयोवृद्धांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. संचारबंदीमुळे आजी-आजोबांच्या घरी त्यांना काम करणारे तसेच त्यांना सांभाळणाऱ्या व्यक्ती कामावर येऊ शकत नाहीत तसंच त्यांना तयार जेवणं मिळण्यातही अडचणी येतात. अशा आजीआजोबांना मदत मिळत नसेल तर युवासेना त्यांच्या दुपारच्या जेवणाची सोय करेल असं युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. ही मदत विलेपार्ले पूर्व भागात एकट्या राहणाऱ्या आजी आजोबांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर कोणत्या आजीआजोबांना या मदतीची गरज असेल तर त्यांना ती खाली दिलेल्या पद्धतीने मिळू शकते.

  • आपल्याला युवासेनेची मदत हवी असल्यास एक दिवस अगोदर माहिती द्यावी
  • आपला संपर्क क्रमांक व पत्ता आम्हाला मेसेज करावा.
  • ही मदत विलेपार्ले पूर्व भागात एकटे राहणाऱ्या आजी आजोबांसाठी आहे
  • सिद्धेश चंद्रकांत पवार- युवा शाखा अधिकारी, 9870074763
आपली प्रतिक्रिया द्या