पुणे- कोरोनामुळे आणखी एका पोलिसाचा मृत्यू, पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या 5 वर गेली

कोरोनामुळे पुणे शहर पोलीस दलातील एका हवालदाराचा मृत्यू झाला आहे. पोलीस हवालदार विनोद पोतदार (वय 51)  असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोतदार यांच्या मृत्यूमुळे आता कोरोनाच्या संसर्गामुळे पोलीस दलातील मृत्यूमुखी पडणाऱ्यांची  संख्या पाचवर गेली आहे.  पोतदार यांच्या मृत्यूमुळे दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विनोद पोतदार हे वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना रक्तदाबाचाही  त्रास होता. पोतदार यांच्या एका जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यांतर पोतदार यांना जबरदस्त धक्का बसला होता. यानंतर प्रकृती खालावत गेल्याने उपचारादरम्यान त्यांचा गुरुवारी मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या