उष्ण वातावरणात कोरोना पसरत नाही? वाचा कोरोनाबाबतच्या अफवा आणि सत्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसमुळे हिंदुस्थानमध्ये गुरुवारी एकाचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये हा मृत्यू झाला असून यामुळे देशातील मृतांचा एकदा 4 झाला आहे. जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या या व्हायरसचा धसका सर्वांनी घेतला आहे. या व्हायरस बाबत अनेक अफवाही पसरल्या जात आहेत. या अफवा आणि जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेले तथ्य काय आहे हे पाहूया…

काय आहेत अफवा अरबी तथ्य –
1. कोरोना व्हायरस उष्ण आणि दमट वातावरणात पसरत नाही असे मेसेज व्हायरल होत आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने यास दुजोरा दिलेले नाही. कोरोना कोणत्याही वातावरणात पसरू शकतो. त्यामुळे लोकांनी वातावरणाची चिंता करण्यापेक्षा आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन डब्ल्यूएचओने केले आहे.

2. कोरोना व्हायरस थंड वातावरणात जिवंत राहात नाही आणि गरम पाण्याने अंघोळ केल्याने कोरोना आपल्या जवळही फिरकू शकत नाही अशीही अफवा पसरली आहे मात्र कोरोना त्याला अनुकूल असणाऱ्या कोणत्याही वातावरणात संक्रमित होऊ शकतो अथवा त्याला कोणत्याही वातावरणात संक्रमित होण्यापासून रोखले जाऊ शकते. तसेच कोरोना पाण्यातूनही संक्रमित होऊ शकतो. यामुळे गरम पाण्याने अंघोळ केल्याने कोरोना होत नाही हे साफ खोटे आहे.

3. डासांमुळे कोरोना पसरत नाही किंवा केस सुकवण्याच्या मशीनने कोरोना मरतो अशाही लोकांची धारणा आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने यास दुजोरा दिलेला नाही. डासांमुळे कोरोना पसरल्याचे प्रकरण सध्या तरी समोरील आलेले नाही. एखादा व्यक्ती खोकला किंवा शिंकला तर त्याद्वारे हा व्हायरस पसरण्याचा धोका अधिक आहे. तसेच केस सुकवण्याच्या मशीनने कोरोना मरत नाही. कारण तो जिवाणू नाही तर विषाणू आहे.

4. थर्मल स्कॅनरने कोरोनाची माहिती मिळते किंवा अल्कहोल अथवा क्लोरिनमुळे कोरोना मारतो अशाही अफवा पसरत आहे. मात्र जागतिक संघटनेने याबाबत सांगितले की, थर्मल स्कॅनरमुळे फक्त आपल्या शरीराचे वाढलेले तापमान कळते. यामुळे तुम्ही संक्रमित झाल्याचे कळू शकते मात्र तुम्हाला कोरोना झाला हे यामुळे सिद्ध होत नाही. तसेच अल्कोहोल किंवा क्लोरीन लावल्याने कोरोना मरत नाही. शरीरात असणाऱ्या या विषाणूचा खात्मा वैद्यकीय उपयांनीच होऊ शकतो.

5. लसूण खाल्ल्याने किंवा गोमूत्र पिल्याने कोरोना होणार नाही असेही मेसेज पसरले जात आहे. लसूण शरीरासाठी आवश्यक आणि पोषक आहे. यामध्ये अनेक अँटीबायोटिक तत्व असतात, मात्र यामुळे कोरोना होऊ शकत नाही याबाबत कोणतेही पुरावे मिळालेले नाही. तसेच गोमूत्राबाबत केलेल्या दाव्यांमध्येही तथ्य नाही.

6. कोरोना फक्त वयस्कर लोक किंवा लहान मुलांसाठी घातक आहे असेही बोलले जात आहे. मात्र यास दुजोरा मिळालेला नाही. कोरोना कोणत्याही वयाच्या व्यक्तींमध्ये संक्रमित होऊ शकतो असे, जागतिक आरोग्य संघटनेने म्हंटले आहे. वयस्कर लोकांना मधुमेह, ह्रदयरोग, दमा यासारखे आजार असल्याने तो कोरोना अधिक बळावतो असेही डब्ल्यूएचओने नमूद केले आहे.