टॉम हँक्सला CoronaVirus ची लागण, ट्विटद्वारे दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगप्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्स ( Tom Hanks ) यालाही कोरोना व्हायरसची ( CoronaVirus ) लागण झाली आहे. टॉमने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. त्याला एकट्यालाच नाही तर त्याच्या बायकोलाही या आजाराची लागण झाल्याचं त्याने सांगितलं आहे. मी आणि माझी पत्नी रिटा विल्सन ( Rita Wilson ) यांची चाचणी करण्यात आली असता आम्हा दोघांना या आजाराची लागण झाल्याचं निष्पन्न झालं असं टॉमने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टॉमने जे ट्विट केलंय त्यात त्याने म्हटलंय की ‘ रिटा आणि मी ऑस्ट्रेलियाला आहोत. आम्ही थोडे थकलो होतो. थंडी वाजत होती आणि थोडं अंग मोडत होतं. रिटाला थंडी वाजून कापरं भरत होतं आणि तिला तापही आला होता. सध्याची परिस्थिती पाहता योग्य गोष्ट हीच होती की आम्ही जाऊन तपासणी करावी. आम्ही ती तपासणी केली आणि आम्हाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं’

टॉमने पुढे म्हटलंय की ‘आता पुढे काय करायचं ? वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काही नियम असतात ते पाळलेच पाहिजेत. आमच्या नियमित चाचण्या केल्या जातील, निरीक्षणाखाली  आणि इतरांपेक्षा वेगळं ठेवलं जाईल Isolation. us miNx हे सगळं लोकांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी करणं गरजेचं आहे.आम्ही घडामोडी तुम्हाला कळवत राहूच, तुम्ही तुमची काळजी घ्या, हँक्स”

हे ट्विट केल्यानंतर टॉमच्या च्याहत्यांनी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली आहे. टॉमने ट्विट करताच एका तासाच्या आत त्याचं हे ट्विट 2,33,000 लोकांनी लाईक केलं होतं तर 76,300 जणांनी ते रिट्विट केलं होतं.

टॉम हँक्स आणि त्याची बायको रिटा विल्यम्स हे दोघे सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. बाझ लुहरमनच्या आगाची चित्रपटाच्या निर्मितीपूर्व प्रक्रियेत भाग घेण्यासाठी हे दोघे तिथे गेले होते. लुहरमन प्रख्यात गायक एल्व्हीस प्रेस्लीच्या जीवनावर आधारीत चित्रपट करत आहे. या चित्रपटामध्ये टॉम हा प्रेस्लीच्या व्यवस्थापकाची म्हणजेच कर्नल टॉम पार्करची भूमिका साकारणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने ‘महामारी’ घोषित केला

जगभर कहर माजवलेल्या आणि हिंदुस्थानात फैलावत चाललेल्या कोरोनाला बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ‘महामारी’ म्हणून घोषित केले. कोरोनाचा फैलाव धोकादायक पातळीवर पोहोचला आहे, असे नमूद करीत डब्ल्यूएचओने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. बुधवारपर्यंत जगभरात 1 लाख 18 हजार 381 जणांना  साथीच्या आजाराची लागण झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.