पालिकेच्या कोरोना लढय़ात मुंबईकरांना बेडपासून ऍम्ब्युलन्सपर्यंत सर्व प्रकारची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणारे ‘वॉर रूम’ आता मुंबईकरांचे ‘आरोग्य मित्र’ बनणार आहेत. कोरोना पूर्ण आटोक्यात आला तरी हे ‘वॉर रूम’ बंद करण्यात येणार नसून या ठिकाणाहून मुंबईकरांना एका कॉलवर पालिका रुग्णालयातील बेड, आरोग्य सुविधा आदींची माहिती देणार आहेत. याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.
मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सुरुवातीला रुग्णांना बेड मिळणे मुश्कील होते. यावेळी पालिकेने कोरोनाबाधित रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण करून देण्यासाठी सर्व 24 वॉर्डमध्ये ‘वॉर रूम’ सुरू केले. पालिकेची रुग्णालये, कोविड केंद्रे, खासगी रुग्णालयांमध्येही याच वॉर रूमच्या माध्यमातून रुग्णांना दाखल करणे अनिवार्य करण्यात आले. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यास मदत झाली. मात्र आता कोरोना आटोक्यात आल्याने वॉर रूमचे काय करणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
असा होणार फायदा
डिजास्टर कंट्रोल रूमच्या स्तरावर हे वॉर रूम तयार केले होते. त्यामुळे आगामी काळात या ठिकाणी त्या त्या वॉर्डच्या डिजास्टर मॅनेजमेंटची जबाबदारी पार पाडली जाणारच आहे. शिवाय या ठिकाणी आरोग्य सुविधांसाठी हॉट लाइन सुरू केली जाईल. या ठिकाणी कॉल करून आपल्याला असलेला आजार किंवा समस्या सांगितल्यास पालिकेची संबंधित आरोग्य सुविधा जवळच्या कोणत्या ठिकाणी, रुग्णालयात उपलब्ध आहे याची माहिती दिली जाईल. आवश्यकता भासल्यास ऍम्ब्युलन्सची उपलब्धता करून दिली जाईल.
कोरोना काळात प्रत्येक वॉर्डमधील वॉर रूममध्ये ए किभागासाठी – 22700007, बी किभाग – 2375 9023, सी किभाग – 2219 7331, डी किभाग – 23835004, ई किभाग – 2300 0150, एफ/दक्षिण किभाग – 2417 7507, एफ/उत्तर किभाग – 24011380, जी/दक्षिण किभाग – 2421 9515, जी/उत्तर किभाग 2421 0441, एच/पूर्क किभाग – 2663 5400, एच/पश्चिम किभाग – 2644 0121, के/पूर्क किभाग – 2684 7000, के/पश्चिम किभाग – 2620 8388, पी/दक्षिण किभाग – 2878 0008, पी/उत्तर किभाग – 2844 0001, आर/दक्षिण किभाग – 2805 4788, आर/उत्तर किभाग – 2894 7350, आर/मध्य किभाग – 2894 7360, एल किभाग – 2650 9901, एम/पूर्क किभाग 2552 6301, एम/पश्चिम किभाग 2528 4000, एन किभाग 2101 0201, एस किभाग 2595 4000, टी किभाग 2569 4000 असे फोन नंबर उपलब्ध करून देण्यात आले होते.


























































