कोरोनाच्या विषाणूला आवडतात ‘ए’ रक्तगटाची माणसे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूची व्याप्ती जगभरात वाढल्याने संशोधक मंडळीही त्यावर रात्रंदिवस संशोधन करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी रामबाण औषध शोधत आहेत. चीनमध्ये संशोधन करत असतानाच असे आढळून आले आहे की कोरोनाच्या विषाणूला ‘ए’ रक्तगटाची माणसे अधिक आवडतात. चीनच्या वुहान आणि शेन्झेन प्रांतात आढळलेल्या सुमारे दोन हजार कोरोनाबाधित रुग्णांचा संशोधकांनी अभ्यास केला. त्यातील बहुतांश रुग्णांचा रक्तगट हा ‘ए’ असल्याचे आढळले. या रक्तगटाच्या व्यक्तींमध्ये कोरोनाचा संसर्ग इतर रक्तगटाच्या व्यक्तींपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. ‘ओ’ रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोना संसर्ग होण्याचा धोका कमी असतो असाही निष्कर्ष संशोधकांनी काढला.

कोरोनाची लागण झालेले व परदेशात असलेले हिंदुस्थानी

  • इराण – 255 n यूएई – 12
  • इटली – 5
  • हाँगकाँग – 1
  • कुवैत – 1
  • रवांडा – 1
  • श्रीलंका – 1
  • एकूण संख्या – 276