चाकरमान्यांसाठी ‘डिजिटल शिमगोत्सव’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होळी म्हटली की, चाकरमान्यांना गावचे वेध लागतात. शिमगोत्सवात ग्रामदैवतांच्या पालखीला चाकरमानी गावाला हमखास जातोच. यंदा कोरोनामुळे उत्सवावर निर्बंध आले. त्यामुळे मुंबईकर उत्सवाला मुकणार आहेत. त्यांना शिमगोत्सवाचे डिजिटल दर्शन घडवण्यासाठी तालुका दापोली डॉट कॉम आणि दापोली पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरीत्या पुढाकार घेतला आहे. त्यासाठी गावातल्या शिमगोत्सवाचे पारंपरिक व वैशिष्टय़पूर्ण व्हिडीओ पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे व्हिडीओ www.talukadapoli.com च्या माध्यमातून प्रसारित केले जातील. त्यासाठी मोबईल किंवा पॅमेऱयात शूटिंग केलेले तीन मिनिटांचे व्हिडीओ पाठवायचे आहेत. व्हिडीओ करण्याआधी मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशा कोरोनासंबंधीच्या अटी व नियमांचे काटेकोर पालन केलेले दिसावे. संपर्क, दीपक सूर्यवंशी 9637904453, विशाल बोरघरे – 9673959333.