कोरोनाग्रस्त डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारी रात्री व्हाईट हाऊसमध्ये परतले. चार दिवस कोरोनावर उपचार घेतल्यानंतर त्यांनी लष्कराच्या रुग्णालयातून सुट्टी मिळवली. घरी परतताच लिफ्टऐवजी जिना चढून ते करच्या मजल्यावर गेले. मास्क खिशात ठेवून बाल्कनीतून त्यांनी पत्रकारांना हात उंचावत अभिवादन केले. त्याद्वारे त्यांनी आपण तंदुरुस्त असल्याचे दाखवून दिले.

ट्रम्प व त्यांची पत्नी मेलानिया यांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी रात्री उशिरा कळले. त्यानंतर शुक्रवारी ट्रम्प यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले, तर मेलानिया यांच्याकर व्हाईट हाऊसमध्येच उपचार सुरू ठेवण्यात आले. ट्रम्प यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी रात्री ते ’मरीन वन’ या शासकीय हेलिकॉप्टरमधून 10 मिनिटांत व्हाईट हाऊसवर परतले. पत्रकारांनी त्यांना काही अंतर ठेवून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर मास्क खिशात ठेवून ट्रम्प यांनी केवळ पत्रकारांना धन्यवाद दिले.

कोरोनाला घाबरू नका!

रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्याआधी ट्रम्प यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला. कोरोनाला घाबरू नका, त्याला तुमच्यावर अधिराज्य करू देऊ नका. आमच्या सरकारने काही प्रभावी औषधे विकसित केली आहेत. जगातील सर्केत्तम वैद्यकीय उपकरणे आपल्याकडे आहेत. आपण काळजी घेऊया. मी 20 वर्षांपूर्वी जसा होतो, त्यापेक्षा अधिक चांगला अनुभव आता घेतोय, असे त्यांनी व्हिडिओद्वारे अमेरिकेतील जनतेला कळवले.