
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन असताना जयगड आणि गुहागर याठिकाणी बोटीतून वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉगडाऊनच्या काळात बोटीतून प्रवासी वाहतूक तसेच खलाशांची वाहतूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
जयगड येथे माता रूक्मिणी नौकेचे मालक विष्णू पवार,तांडेल प्रवीण सुर्वे माता वैशाली नौकेचे मालक विघ्नेश कोळी,तांडेल साईनाथ भाटकर यांनी मुंबई ते करंजा रायगड येथून तिवरी बंदर वरवडे पर्यंत बंदीच्या काळात वाहतूक केल्याच्या आरोपाखाली जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुहागर तालुक्यात वेलदूर अंजनवेल येथे श्री गणेशकृपा,कल्याणीकृपा रत्नमाऊली,आई झरीमारी श्रध्दा यानौकांमधून 72 खलाशांनी प्रवास केला.बंदीच्या काळात केलेल्या वाहतुकीमुळे किशोर चव्हाण,मंदार कोलथकर,जयदास नाखवा,गणेश असगोलकर,विधु कोळी,वनराज आंबेरकर यांच्या गुहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याचबरोबर गुहागर तालुक्यात पालशेत बंदर येथे ओमसाई नौका,शिव केदारनाथ,आई झरीमारी श्रध्दा आणि नवरत्न या नौकेतून खलाशांची वाहतूक केल्याने मंगेश चव्हाण,संतोष पालशेतकर,विष्णू कोळी,वनराज आंबेरकर,हरेश कोळी,सागर मोरे,निलेश कोळी,प्रशांत पावसकर यांच्यावर गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
































































