सिंधुदुर्गात अनावश्यक फिरणाऱयांची ‘आरटीपीसीआर’, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

गेल्या दोन वर्षांत सिंधुदुर्गातील वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग या तालुक्यांमध्ये कोविडचे पॉझिटिव्ह रुग्ण दगावण्याची सर्वात जास्त संख्या सावंतवाडी तालुक्यामध्ये आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी यापुढे जिह्यात अनावश्यक फिरणाऱयांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ला येथे पत्रकार परिषदेत केले.

90 टक्के नागरिक सर्व नियमांचे पालन करतात. 10 टक्के लोक रस्त्यावर फिरताना दिसतात. त्यातील 2 ते 3 टक्के हे अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेले असतात व इतर लोक अनावश्यक कारणांसाठी फिरत असतात. यापुढे जिह्यात अन्यावश्यक जे रस्त्यावर फिरताना दिसतील त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे व त्याची सुरुवात आजपासून झाली आहे. पुडाळमध्ये आज अनावश्यक फिरणाऱया 12 जणांच्या, कणकवलीत 14 जणांच्या टेस्ट झाल्या असून त्याचे सर्व अधिकार प्रांताधिकारी यांना दिले आहे.

दिगशीत कोरोना शंभरी गाठणार!

तालुक्यात कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या दिगशीमध्ये आज 31 नवीन रुग्ण सापडले आहेत. दिगशीतील रुग्णांची संख्या 94 वर पोहोचली आहे. त्यामुळे दिगशी गाव कण्टेंनमेंट झोन करण्यात आला असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात कोरोनाने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दिगशीत आरोग्य पथकाकडून सर्व्हे सुरू आहे. गावात पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी एक पोलीस हवालदार, एक पोलीस अमलदार व 5 होमगार्ड असा पोलीस बंदोबस्त लावला आहे. गावातील नागरिकांना घाबरून न जाता लक्षणे असल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या