पुण्यात ‘कोरोना’चे पाच रुग्ण आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात थैमान घालणाऱया ‘कोरोना’चे पुण्यात पाच रुग्ण आढळले आहेत. नायडू हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षामध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. दुबई येथे जाऊन आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी एकूण पाच पथकांची स्थापना केली आहे. नागरिकांनी घाबरू नये. मात्र, आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

यासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. रविवारी पुण्यात दोन ‘कोरोना’बाधित पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. हे रुग्ण दुबईहून प्रवास करून आलेले आहेत. संबंधित दोन्ही व्यक्ती फेब्रुवारी महिन्याच्या शेकटच्या आठकडय़ात दुबई येथे 40 जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेल्या होत्या. 1 मार्च रोजी ते हिंदुस्थानात परतले. या दोन व्यक्तींपैकी एका व्यक्तीला त्रास सुरू झाल्यामुळे त्यांनी 8 मार्च रोजी डॉक्टरकडून आपली तपासणी करून घेतली. त्यावेळी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर या 40 जणांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार या दोघांव्यतिरिक्त आणखी तीनजण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात त्या रुग्णांच्या मुलीचाही समावेश आहे. तसेच त्या दोन रुग्णांनी मुंबई ते पुणे कॅबने प्रवास केला होता. त्या कॅबचालकालाही ‘कोरोना’ची लागण झाली आहे. कॅबमध्ये आणखी एक प्रवासी होता. तोही ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आहे. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू असून, तिघांचीही प्रकृती स्थिर आहे, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. दुबई हे ठिकाण केंद्र शासनाने जाहीर केलेल्या बाधित ठिकाणांच्या यादीमध्ये नसल्यामुळे संशयित रुग्ण 1 मार्चला हिंदुस्थानात परतल्यानंतर त्यांचे विलगीकरण करण्यात आले नाही. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’तर्फे जिह्यातील सर्क डॉक्टरांना त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांची तपासणी करताना परदेशातून आलेल्या रुग्णांची माहिती स्वतंत्र ठेकावी, असे आवाहन त्यांनी केले.

‘त्या’ 40 नागरिकांच्या तपासणीची कार्यवाही सुरू

या दोन्ही व्यक्तींसोबत दुबई येथे गेलेल्या एकूण 40 व्यक्तींची नाके आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध असून, हे विविध जिह्यांतील नागरिक आहेत. संबंधित जिल्हा प्रशासन त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची तपासणी करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करीत असल्याचे डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

‘त्या’ सोसायटीतील सफाई कर्मचाऱयांना अन्य सोसायटय़ांत कामाला येऊ नका अशा सूचना

पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण सापडल्यानंतर भीतीचे वातावरण आहे. कोरोना रुग्ण सापडलेल्या सोसायटीमध्ये काम करणाऱया सफाई कर्मचारी आणि कामवाली बाईंना अन्य सोसायटीवाल्यांनी कामावर येऊ नका, असे सांगितले आहे.

महापौर चषक स्पर्धा स्थगित

पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर पुणे महापौर चषक क्रीडा स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेला नागरिकांची आणि क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी होत असते, त्यामुळे कोणताही धोका निर्माण होऊ नये, म्हणून हा निर्णय घेतल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी

‘कोरोना’बाधित दोन्ही व्यक्ती हिंदुस्थानात परतल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेण्यात आली आहे. त्यांनी यापूर्कीच्या 15 दिकसांच्या कालावधीत कोणत्या ठिकाणी प्रवास केला त्याची माहिती घेण्यात आली आहे. या दोन्ही रुग्णांचे कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच त्यांच्या कार्यालयीन ठिकाणी असलेले अधिकारी-कर्मचारी यांचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे.