रायगडातील दारूची दुकाने, बार परमिट रूम बंद सार्वजनिक कार्यक्रमांवर कडक निर्बंध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर रायगड जिल्‍हयातील दारूची दुकाने बार, परमिट रूम तातडीने बंद करण्‍याचे आदेश रायगडच्‍या जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले आहेत. याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. या आदेशाचे सामान्‍य नागरीकांकडून स्‍वागत होत असले तरी तळीरामांचा हिरमोड झाला आहे.

जीवघेण्‍या आजारापासून रोखण्‍यासाठी राज्‍य सरकारने दिलेल्‍या आदेशांची रायगड जिल्‍हा प्रशासनातर्फे कडक अंमलबजावणी सुरू आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्‍यासाठी वेगवेगळया उपाययोजना सुरू असतानाच जिल्‍हा प्रशासनाने कडक पावलं उचलण्‍यास सुरूवात केली आहे. आता परमिट रूम बार देखील बंद करण्‍यात आले आहेत. महत्‍वाचे म्‍हणजे दारूची दुकानेदेखील बंद करण्‍याचे फर्मान गुरुवारी जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले आहेत.

जिल्‍हाधिकारी यांच्‍या निर्णयामुळे बारमध्‍ये होणारी गर्दी आपोआप टळणार आहे. या निर्णयाबददल सामान्‍य नागरीकांनी समाधान व्‍यक्‍त केले आहे. मात्र यामुळे दररोज पिण्‍याऱ्याची अडचण होणार आहे. दारूची दुकाने बार परमिट रूम उघडे दिसले तर त्‍यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. ही बंदी 31 मार्चपर्यंत लागू असणार आहे. मात्र काही ठिकाणी चोरटया पदधतीने दारूची विक्री केली जाते ती रोखण्‍याचे आव्‍हान पोलीस आणि उत्‍पादन शुल्‍क विभागासमोर असणार आहे.

सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी

सार्वजनिक कार्यक्रम सभा समारंभ यातून कोरोनाच्‍या विषाणूचा संसर्ग कार्यक्रमांवर बंदी घालण्‍यात आली आहे. त्‍यानुसार हॉटेलमधील हॉल, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृह या ठिकाणी लग्‍न समारंभ, धार्मिक व सामाजिक उपक्रम घेता येणार नाहीत.