
कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण महाराष्ट्रात राज्यात आढळून येत असल्यामुळे कोरोना विषाणू (COVID-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकानी जीवनाश्यक वस्तू मिळणाऱ्या दुकानात गर्दी टाळणे गरजे आहे. त्यामुळे जिल्हयातील जीवनाश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी होम डिलीव्हरीवर भर द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी दिल्या. जिल्हाधिकारी सभागृह, जिल्हाधिकारी येथे सोमवारी जिल्हाधिकारी यांनी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.
कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दुकानामध्ये गर्दी टाळणे गरजेचा आहे. यासाठी होम डिलीव्हरीवर भर द्या. वाहतुकीस काही अडचण असल्यास सांगा. होम डिलीव्हरी करणाऱ्यांचा तसेच वाहनाचा क्रमांक द्या जेणेकरुन आपल्याला होम डिलीव्हरी करताना अडचण होणार नाही. आपल्या दुकानांची सुरु राहण्याची वेळ ठरवून घ्या. प्रशासनाकडून त्याबाबत आदेश निर्गमित करण्यात येतील.आपल्या दुकानामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या, अन्यथा जीवनाश्यक वस्तूंची दुकानेही बंद करावी लागतील, अशा सूचना यांनी यावेळी दिल्या.
































































