गुजरात मॉडेलची स्थिती बघा! नवाब मलिक यांचा भाजपला सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सा सल्ला नवाब मलिक यांनी दिला आहे. गुजरातमध्ये रुग्णालयाअभावी लोक मरत आहेत, असेही मलिक यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या दुसऱया लाटेत राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱया पडू लागल्या आहेत. यावरून सत्ताधारी आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेत्यांकडून होणाऱया टीकेला नवाब मलिक यांनी सोमवारी उत्तर दिले.

भाजप शासित उत्तर प्रदेशमध्ये रामभरोसे कारभार सुरू आहे. चाचण्या तर होतच नाहीत. आरटीपीसीआरही केली जात नाही. अण्टिजेन चाचणीत 80 टक्केही अचूकता नाही. यूपी सरकारने योग्य प्रकारे टेस्टिंग केल्या तर वेगळी परिस्थिती होऊ शकते, असेही नवाब मलिक म्हणाले. लॉकडाऊनच्या काळात इथून निघताना मजुरांनी राज्य सरकार जिंदाबाद… मुख्यमंत्री झिंदाबाद अशा घोषणा दिल्या होत्या. परंतु तिथे गेल्यावर लोकांनी भाजपचा मुर्दाबाद केला हे भाजपने लक्षात घेतले पाहिजे, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.