मुंबई-ठाण्यात चार लाख कुटुंबांचे सर्वेक्षण ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविली जात आहे. मुंबई-ठाण्यातही या मोहिमेने जोर पकडला असून आरोग्य सेविका, आशासेविका आणि स्वयंसेवकांकडून घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहेत. मुंबई-ठाण्यात आतापर्यंत चार लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पार पडले असून 14 लाखांहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली.

मुंबईत आतापर्यंत 2 लाख 34 हजार 63 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सात लाख 88 हजार 32 लोकांची तपासणी करण्यात आली असून यात 690 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात 2 लाख 9 हजार 208 कुटुंबांमध्ये सहा लाख 64 हजार 290 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 238 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

कोकणात तीन लाख कुटुंबांचे सर्वेक्षण

कोकणातील तीन लाखांहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. रायगड जिह्यात 2 लाख 40 हजार 851 कुटुंबांमधून 8 लाख 82 हजार 311 लोकांची तपासणी झाली आहे. सिंधुदुर्गात 10 हजार 634 कुटुंबांमधून 37 हजार496 लोकांची तपासणी झाली आहे. यात 10 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

  • कोल्हापुरात 3 लाख 46 हजार 859 कुटुंबे, 15 लाख 17 हजार 754 लोकांची तपासणी; 1033 कोरोना रुग्ण
  • संभाजीनगर 2 लाख 64 हजार 77 कुटुंबे, 11 लाख 50 हजार 365 लोकांची तपासणी; 419 कोरोना रुग्ण
  • पुणे महापालिका क्षेत्रात 2 लाख 9 हजार 208 कुटुंबे; 5 लाख 51 हजार 334 लोकांची तपासणी; 359 कोरोना रुग्ण
  • 76,96, 580 – कुटुंबांचे सर्वेक्षण
  • 3,10,89,494 – लोकांची तपासणी पूर्ण
  • 7,25000 – संशयितांपैकी
  • 22,301 – कोरोना रुग्ण