रेणापूर तालूक्यातील घनसरगाव येथे पती-पत्नीची मध्यराञी आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लातूर

लातूरमधील रेणापूर तालूक्यातील मौजे घनसरगाव येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या दोघांनीही राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. संदिपान प्रभाकर गिरी (वय ४८) व सरोजा संदिपान गिरी (वय ३२) अशी आत्महत्या करणाऱ्या पती पत्नीची नावे आहेत. संदिपान गिरी हे एस.टी.महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होते.

या घटनेची माहिती गिरी दाम्पत्याच्या पुतण्याने रेणापूर पोलीस ठाण्यात येऊन दिली. अद्याप या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. त्या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठण्यात आले आहेत. या दोघांनीही आत्महत्या का केली याचा पोलीस तपास करत आहेत.