
सामना ऑनलाईन, जुनागड
गुजरातमधील जुनागढ कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी कॅन्सरवर गोमुत्र उपयुक्त असल्याचे यशस्वी संशोधन केले आहे. गोमुत्रामुळे तोंडांचा, यकृत, मूत्रपिंडाचा, त्वचेचा आणि स्तनाचा कर्करोग बरा होऊ शकतो असा दावा त्यांनी केला आहे. कृषी विद्यापीठाचे प्रपाठक श्रद्धा भट, रुकमसिंग तोमर आणि कविता जोशी यांनी वर्षभर केलेल्या संशोधनातून हे निष्कर्ष काढले आहे.
या संशोधनावर प्रतिक्रिया देताना श्रद्धा भट म्हणाल्या की “हे संशोधन खूप धोकादायक होते कारण आम्ही कर्करोगाच्या पेंशीवर संशोधन करतो होतो जे आम्ही एका बाटलीत ठेवले होते. दिवसाला नेमकं किती गोमुत्र प्राशन केल्यास कॅन्सर बरा होईल त्याचा शोध घेण्यात आम्हाला यश आले आहे. तसेच पुढे एका उंदरावर ही चाचणी केली जाईल, जर ती यशस्वी झाली तर वेगवेगळ्या कॅन्सरसाठी आम्ही गोळ्या तयार करू.” रुकमसिंग तोमर म्हणाले की केमो थेरपी हे आरोग्यदायी पेशी नष्ट करते तर गोमुत्र फक्त कॅन्सरयुक्त पेशी नष्ट करते.


























































