
तरुणीच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर करणाऱयाला अंधेरी पोलिसांनी अटक केली. जगन्नाथ लक्ष्मण मुंबरकर असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जोगेश्वरी येथे राहणारी तरुणी ही 2018 मध्ये अंधेरी येथे एका कंपनीत कामाला होती. तेव्हा एका मैत्रिणीच्या ओळखीने जगन्नाथ हा तिच्या कार्यालयात आला. त्याने 15 दिवसांत तुमचे क्रेडिट कार्ड तयार होणार असून ते भांडुप येथील कार्यालयात येऊन घेऊन जा असे त्याने सांगितले होते. त्याने कार्डच्या माध्यमातून 81 हजार रुपयांची गंडा घातला. परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांच्या निर्देशानुसार तपास सुरू आहे.




























































