
क्रिकेट प्रशिक्षक हेमू दळवी यांचे आज सकाळी 11 वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 84 वर्षांचे होते. गेले सहा महिने त्यांना दिवसातून तीनवेळा डायलिसीस करावे लागत होते. दहिसर येथे आपल्या मुलीकडे ते राहत होते. संध्याकाळी दहिसर पश्चिम येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी झुनझुनवाला महाविद्यालयातील त्यांचे शिष्य बलविंदरसिंग संधू, रवी ठाकर, मृदुल चतुर्वेदी, अरविंद धुरी, प्रमोद साटम, राजू शिर्पे अशी क्रिकेटपटू मंडळी उपस्थित होती.

























































