महागड्या गाड्यांच्या बॅटर्‍या चोरणारे अल्पवयीन ताब्यात, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महागड्या गाड्यांच्या बॅटर्‍या चोरून विक्रीच्या तयारीत असलेल्या दोघा अल्पवयीतांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन महागड्या बॅटर्‍या, दुचाकी असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यांनी आंबेगाव आणि धनकवडी परिसरातील महागड्या गाड्यांच्या बॅटर्‍या चोरल्याची कबुली दिली.

भारती विद्यापीठ ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ आणि उपनिरीक्षक धीरज गुप्ता हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी आंबेगावमध्ये दोघे अल्पवयीन बॅटर्‍या विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी व आशिष गायकवाड यांना मिळाली. पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी बॅटर्‍या चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड, अमर भोसले, शैलेश साठे, रविंद्र चिप्पा, विश्वनाथ गोणे, हर्षल शिंदे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांनी केली.