
सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईताला दोन वर्षांसाठी पुणेशहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. अविनाश मनोज ढेबे (वय 22, रा. हिंगणे खुर्द) असे तडीपार करण्यात आलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी तडीपारीचा प्रस्ताव पाठविला होता.
शहरातील गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी सराईतांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानुसार अविनाश ढेबेविरूद्ध पुणे जिल्ह्याच्या हद्दीतुन दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त पी डी राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, श्रीकांत माने, गिरीष एर्कोगे, शैलेश चव्हाण यांच्या पथकाने केली.


























































