
मोक्काच्या गुन्ह्यात मागील वर्षभरापासून फरार असणाऱ्याला फरासखाना पोलिसांनी अटक केली. तो वडिलांना भेटायला आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला घरातून ताब्यात घेत अटक केली. राहील अब्दुलरहीम सय्यद (वय 32, रा. गणेश पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
राहील सय्यद याच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाई केल्यानंतर तो फरार झाला होता. तो वडिलांना भेटण्यासाठी गणेश पेठेत येणार असल्याची माहिती पोलीस अमलदार तुषार खडके यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. ही कामगिरी उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, एसीपी सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, समीर माळवदकर, रिजवान जिनेडी, सचिन सरपाले, वैभव स्वामी यांनी केली.




























































