
सामना ऑनलाईन । पॅरिस
झिनेदीन झिदानच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर फ्रान्सने १९९८ साली मायदेशात वर्ल्ड कप जिंकण्याची करामत करून दाखवली होती. त्यावेळी फ्रान्सने क्रोएशियाला उपांत्य फेरीत हरवून अंतिम फेरीत वाटचाल केली होती. आता हेच दोन संघ फायनलमध्ये भिडणार आहेत. लुका मॉड्रिचच्या क्रोएशिया संघाकडे त्या पराभवाचा वचपा काढण्याची सुवर्णसंधी असणार आहे. १९९८ साली झालेल्या लढतीत डेव सुकर याने ४६ व्या मिनिटाला गोल करीत क्रोएशियाला आघाडी मिळवून दिली होती. पण त्यानंतर थुरामने ४७ व ६९व्या मिनिटाला गोल करीत फ्रान्सला विजय मिळवून दिला होता.




























































