खळवाडीत उभी हाय गिरणी। दाणभऱ्या कणसाची मळणी।।

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

कंबरमोडेस्तोवर दिनरात राबताना शेतकऱ्याचा हिरव्या पिकांत जीव रमतो. भरगच्च अन् परिपक्व कणीस जेव्हा खळ्यावर आणतो, तेव्हा शेतकऱ्याला कष्टाचं किती चिज झालं हे कळतं. ऊन्हं-वारा- पाऊस झेलून हाती आलेलं पीक म्हणजे जणू शिवारमायाच असते… उंडणगाव शिवारात सुरू असलेल्या मका पीक मळणीचे हे छायाचित्र नारायण भागवत यांनी टिपले आहे.