मध्य रेल्वेची राजधानी गुरुवारपासून दररोज धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेची नाशिकमार्गे धावणारी सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन राजधानी ट्रेन क्र.01221/ 01222 येत्या गुरुवार 1 जुलैपासून पूर्वीप्रमाणे दररोज धावणार आहे. याआधी कोरोना निर्बंध काळात या गाडीच्या आठवडय़ातून चार फेऱ्या करण्यात आल्या होत्या. राजधानी विशेष ट्रेन क्र . 01221 च्या विस्तारित फेऱ्यांसाठीचे बुकिंग सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर आधीच सुरू झाले आहे. या विशेष ट्रेनमध्ये फक्त कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच परवानगी दिली जाईल. बोर्डींग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी सर्व प्रकारच्या नियमांचे, कोविड-19 शी संबंधित एसओपीचे पालन करावे लागेल, असे मध्य रेल्वेने म्हटले आहे.