सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी दहा कंपन्या शर्यतीत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या पुनर्विकासाठी दहा पंपन्यांच्या ‘आरएफक्यू’ पात्रतेसाठी विनंती निविदा प्राप्त झाल्याचे इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने शुक्रवारी दिल्ली येथे झालेल्या बैठकीनंतर जाहीर केले आहे. या दहा कंपन्यांमध्ये जीएमआर एंटरप्राईजेस लि., आयएसक्यू इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट, कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन लि., अदानी रेल्वे ट्रान्सपोर्ट लि., गोदरेज प्रॉपर्टी लि., ओबेरॉय रियाल्टी लि., किस्टोन रियलटोर लि., मोरीबस होल्डिंग लि., बुकफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड पह्र, अँकरीज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लि. यांचा समावेश आहे.

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील हेरिटेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा 1642 कोटी रुपयांतून ‘पीपीपी मॉडेल’द्वारे पुनर्विकास करण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानक 60 वर्षांकरिता भाडे करारावर देण्यात येणार आहे. विकासकास साधारण 2.54 लाख चौरस मीटरचा बिल्टअप एरिया कमर्शियल डेव्हलमेंटसाठी देण्यात येणार आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अॅप्रेशियल कमिटीने मान्यता दिल्यानंतर 20 ऑगस्ट 2020 रोजी या ‘आरएफक्यू’ निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर निती आयोगाचे सीईओ आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यांच्या उपस्थित 25 सप्टेंबर रोजी निविदा पूर्व बैठक घेण्यात आली होती. इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या दिल्ली येथील कार्यालयात या ‘आरएफक्यू’ निविदा उघडण्यात आल्या असून त्यास दहा बडय़ा कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन आणि रिक्स्वेट फॉर प्रपोजल अशा दोन टप्प्यांत या निविदा निश्चित होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या