
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दक्षिणेकडील सुपरस्टार अभिनेत्याच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक घालताना अपघात झाला आणि यात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तमिळनाडूच्या तिरुकोविलूर येथे अभिनेता अजीत कुमार याचे मोठे कटआऊट उभारण्यात आले. बांबुंच्या सहाय्याने उभारलेल्या या कटआऊटवर काही अतिउत्साही चाहते चढले आणि त्याला फुलांचा हार व दुधाचा अभिषेक घालू लागले. याच दरम्यान बांबुचा ढाचा डगमगायला लागतो. पण हे लक्षात येण्यापूर्वीच हे कटआऊट धाडकन कोसळले आणि त्यावरील लोक जमिनीवर आदळतात. या अपघातामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
#Watch: Five people injured in Thirukovilur, Tamil Nadu after a cut-out of actor #Ajith collapsed during ‘paal abhishekam’ (pouring of milk on the cut-out). pic.twitter.com/jazc6eWInV
— ANI (@ANI) January 10, 2019


























































