बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी दुसऱ्या टीबीएमचे कटरहेड सावली शाफ्टमध्ये दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) हाती घेतलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या 21 किमी लांबीच्या बोगदा प्रकल्पासाठी दुसऱ्या टनेल बोरिंग यंत्राचे (टीबीएम) कटरहेड नवी मुंबईतील घणसोली येथील सावली शाफ्टमध्ये यशस्वीरीत्या उतरविण्यात आले. 13.6 मीटर व्यास आणि जवळपास 350 टन वजनाचे हे कटरहेड टीबीएमच्या मुख्य शिल्ड असेंब्लीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

ही दुसरी टीबीएम सावली येथून विक्रोळीच्या दिशेने बोगद्याचे उत्खनन सुरू करणार आहे. याआधी याच आठवडय़ात पहिल्या टीबीएमचे कटरहेड विक्रोळी येथे उतरविण्यात आले होते. दोन्ही टीबीएमची अंतिम असेंब्ली आणि कमिशनिंग चाचण्या सध्या सुरू असून, जूनअखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवडय़ात प्रारंभिक ड्राइव्ह सुरू होण्याची शक्यता आहे. 13.6 मीटर व्यासाचे हे कटरहेड एकाच मोठय़ा बोगद्यातून हाय-स्पीड रेल्वेच्या अप आणि डाउन दोन्ही मार्गाचे उत्खनन करण्यासाठी विशेष संरचित केले आहे. या कटरहेडमध्ये 84 कटर डिस्क, 124 व्रॅपर आणि 16 बकेट लिप्स बसविण्यात आले असून, खडक कापणे आणि राडारोडा हटविण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनविण्यात आली आहे. ही अत्याधुनिक यंत्रणा कमाल 4 आरपीएम कटरहेड गती आणि 49 मि.मी. प्रति मिनिट उत्खनन क्षमतेसह कार्य करू शकते. त्यामुळे उच्च सुरक्षा मानके राखून नियंत्रित आणि सातत्यपूर्ण बोगदा बांधकाम शक्य होणार आहे.

टीबीएमची वैशिष्टय़े

प्राप्त झालेल्या टीबीएमची संख्या ः 2

टीबीएम 1 चे वजन ः 3080 टन

टीबीएम 2 चे वजन ः 3184 टन

कटरहेडचा व्यास ः 13.6 मीटर

टीबीएमचा प्रकार ः मिक्स शिल्ड/स्लरी आधारित

टीबीएमची एपूण लांबी 95.32 मीटर

टीबीएममद्ये कटर व्हील, मेन बेअरिंग, जॉ क्रशर, इरेक्टर, मेन शिल्ड, टेल शिल्ड.