भरधाव कारने दिलेल्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

देवगड ग्रामीण रुग्णालयासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने सायकलस्वारला धडक देवून झालेल्या अपघातात सायकलस्वाराच्या डोक्याला दुखापत झाली. हा अपघात मंगळवारी सायंकाळी झाला.

या अपघातानंतर कारचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अपघातात सायकल स्वार राजेंद्र भिकाजी दहिबावकर (52 रा, वेळवाडी) यांना उपचाराकरिता  देवगड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची नोंद अद्यापही देवगड पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नाही. अपघाताची नोंद अद्यापही देवगड पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नाही, मात्र देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सीसीटीव्हीद्वारे भरधाव जाणाऱ्या कारचा शोध घेत आहेत.