वडीगोद्री परिसरात दरोड्याची मालिका सुरुच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील शस्त्र दरोड्याला २४ तास उलटत नाही तर त्याच परिसरातील कुरण येथे शेतवस्तीवर शस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत तीन घरे लुटून जवळपास सोन्या-चांदीसह ४ लाखांचा ऐवज चोरून नेला.  या परिसरात एकाप्रकारे दरोडेखोरांनी धुमाकूळच घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. दरम्यान दरोडेखोरांच्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे.

अंकुशनगर येथील गणेश सुरासे यांच्या घरांवर शस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दोन लाखांचा दरोडा टाकून लुटून नेल्याला घटनेला अवघे २४ तास उलटत नाही तोच प्रकार शुक्रवारी रात्री कुरण येथील सुंदरराव जिजाभाऊ सोलनकर त्यांचा मुलगा नितेशसह बाहेरच्या अंगणात झोपलेले होते.  घराच्या पाठीमागून शेतातून ५ ते ६ दरोडेखोरांनी घराच्या खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन घरातील ५० हजार रुपये व सोने घेऊन जिजाभाऊ आणि नितेश दोघां बाप-लेकांना खोलीत कोंडले. शेजारच्या खोलीत झोपलेल्या शाम सोलनकर खोलीचे दरवाजा उघडून शस्त्राचा धाक त्यांच्या पत्नीच्या नाका -कानातील गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेत मोबाईल फोनही घेऊन त्या दोघांना ही खोलीत कोंडले. ही घटना ११.४५ च्या सुमारास घडली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेले सुंदरराव सोलनकर यांना संभाजीनगर येथे एका दवाखान्यामध्ये दाखल केले आहे. त्यानंतर त्या दरोडेखोरांनी गावातीलच वस्तीवर १ वाजण्याच्या सुमारास अशोक भगवान काळे यांच्या घरावर दरोडा घातला.  यावेळी बाहेर झोपलेले भगवान काळे त्यांच्या पत्नीला घरात कोंडून टाकले. त्यांचे जवळपास दोन तोळयांच्या पुढे सोने घेऊन शेजारच्या सुरेश बाजीराव सोनसळे यांच्या घरी गेले. त्यांच्या पत्नीच्या अंगावरील तसेच घरातील एका तोळा सोने लुटून नेले. आलेले सर्व दरोडेखोर हिंदीतून संवाद करीत होते. सर्वांच्या हातात धारदार शस्त्र होते. जवळपास अंकुशनगरचा दरोडा आजचा शेतवस्तीवर पडलेले दरोडे सारखेच होते. अंकुशनगर येथे दरोडा टाकणार्‍याकडे धारदार हत्यारे,  दगडे होती. ग्रामस्थ व दरोडेखोरांमध्ये तुफान दगडफेक झाली. परंतु या दरोड्याकडे गोंदी पोलिसांनी विशेष असे गांभीर्य घेतलेच नाही. अप्पर पोलीस अधिक्षकांसह, पोलीस उपविभागीय अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे तसेच दरोडा प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. तसेच श्वान पथक ही पाचारण करण्यात आले. परंतु त्याला कुठल्याही प्रकारचा माग काढता आला नाही. परिसरातील दोन महिन्यापासून दरोड्याचे प्रमाण वाढलेले असतांनाही पोलिसांना हे स्पशेल अपयश आले आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.