
मेष (ARIES – Friday, February 11, 2022)
आहारात केशर वापरा. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. इतरांमधील दोष शोधणे टाळा. तुमच्या मेहनतीला यश येण्याचा आजचा दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत सहकाऱ्यांना सांभाळून घ्यावे लागेल.
शुभरंग: लाल
वृषभ (TAURUS – Friday, February 11, 2022)
शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडाची गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आहारात मांसाहारी पदार्थ जास्त प्रमाणात खाणे टाळा. आपल्या आवडीच्या रंगाचा पोषाख परिधान करा. समस्येवर अनुभवी व्यक्तिंचे मार्गदर्शन घ्या.
शुभरंग: हिरवा
मिथुन (GEMINI – Friday, February 11, 2022)
नवीन नोकरीची संधी मिळू शकते. प्रवास जपून करा. गणपतीची पूजा करा. विरंगुळ्यासाठी वेळ घालवाल. कार्यालयातून लवकर घरी याल. जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यामुळे भावूक व्हाल. कुणाचे मन दुखवू नका.
शुभरंग: नारिंगी
कर्क (CANCER – Friday, February 11, 2022)
जवळचे लोक भेटतील. घरातील हसतेखेळते वातावरण राहील. आहारात दह्याचा समावेश करा. रिकाम्या वेळेत आवडती मालिका किंवा सिनेमा पाहाल. जोडीदाराला समजून घ्या. घरी पाहुणे येतील.
शुभरंग: आकाशी
सिंह (LEO – Friday, February 11, 2022)
गुंतवणूक करण्यापूर्वीच काळजी घ्या. आजी-आजोबांना वेळ द्या. अनावश्यक बडबड करू नका. आज प्रिय व्यक्तिची भेट होईल. आज सायंकाळचा वेळ जोडीदारासोबत घालवाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
शुभरंग: पिवळा
कन्या (VIRGO -Friday, February 11, 2022)
घरातील मोठ्या व्यक्तिंचे म्हणणे ऐकावे लागेल. एखादी बातमी अनपेक्षितरित्या कानी येण्याची शक्यता आहे. मिळालेल्या रिकाम्या वेळेत आवडते संगीत ऐकाल किंवा आवडते पुस्तक वाचाल.
शुभरंग: पोपटी
तूळ (LIBRA – Friday, February 11, 2022)
वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवा. मन:स्वास्थासाठी ध्यानधारणा करा. नातेवाईकांच्या भेटी होतील. घरात धार्मिक कार्य पार पडण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
शुभरंग: किरमिजी
वृश्चिक ( SCORPIO – Friday, February 11, 2022)
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे. घरातील खिडक्यांना बदामी किंवा पांढऱ्या रंगाचे पडदे लावा. प्रिय व्यक्तिची भेट होईल. ऑफिसमधून लवकर घरी जाल. सायंकाळी पार्कमध्ये फिरायला जाल. स्वत:ची खासगी गोष्ट कोणालाही सांगू नका.
शुभरंग: केशरी
धनु (SAGITTARIUS – Friday, February 11, 2022)
काळ्या रंगाचे बूट वापरा. घरातील तुळशीला रोज सकाळी पाणी घालून नमस्कार करा. प्रवासात सतर्क राहा. वाढलेल्या कामामुळे दगदग होण्याची शक्यता आहे. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
शुभरंग: जांभळा
मकर ( CAPRICORN – Friday, February 11, 2022)
जुनी येणी वसूल होतील. चांगल्या बातम्या कळतील. मित्रमंडळींना मदत करावी लागेल. कोणाविषयीही गैरसमज बाळगू नका. आवडत्या कलेत मन रमवा. चांदीचे दागिने परिधान करा. व्यावसायिक प्रगती होईल.
शुभरंग: निळा
कुंभ (AQUARIUS – Friday, February 11, 2022)
पथ्यपाण्याबाबत काळजी घ्या. मनात सकारात्मक विचार ठेवा. कामे साध्य होतील. सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. चांगल्या उपक्रमात सहभागी व्हाल. समाजात तुमचे महत्त्व वाढेल. मनोरंजनासाठी पैसे खर्च कराल.
शुभरंग: काळा
मीन (PISCES – Friday, February 11, 2022)
नवीन संधी मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. आज जोडीदाराच्या पुन्हा एकदा नव्याने प्रेमात पडाल. कामाच्या वाढत्या व्यापामुळे मित्रमंडळींना वेळ देता येणार नाही. आज मिळालेला रिकाम वेळ विश्रांती घेण्यात घालवाल.
शुभरंग: खाकी


























































