
मेष (ARIES – Friday, February 11, 2022)
तुमच्या कामाचे कौतुक होईल. प्रिय व्यक्तिशी प्रेमाचे भांडण होईल. आज घरी स्वयंपाकात सगळ्यांच्या आवडीचा बेत बनवाल. घरातील ज्येष्ठ व्यक्तिंचे आशीर्वाद लाभतील. गणपती अथर्वशीर्षाचे वाचन करा.
शुभरंग: नारिंगी
वृषभ (TAURUS – Saturday, February 12, 2022)
वरिष्ठ खूश होतील. आळस घालून जिद्दीने कामाला लागाल. आरोग्यात सुधारणा होईल. तुमच्या हुशारीने समाजातील लोकं प्रभावित होतील. नवीन कामामुळे उत्साह वाढायला मदत होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल.
शुभरंग: सोनेरी
मिथुन (GEMINI – Saturday, February 12, 2022)
आजचा दिवस शुभदायक आहे. तुमच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या घटना घडतील. कारण कोणतेही असो पण निराश होऊ नका. समाजात मान मिळेल. आवडीचा पोषाख परिधान करा. सकारात्मकता वाढायला मदत होईल.
शुभरंग: चंदेरी
कर्क (CANCER – Saturday, February 12, 2022)
नव्या सौंदर्यप्रसाधनांची खरेदी कराल. आवडत्या क्षेत्रात प्रवेश होण्याची शक्यता आहे. दिवसभरात आनंददायी बातमी कानी येण्याची शक्यता आहे. आवडीच्या व्यक्तिसोबत दिवस घालवाल. व्यवसायातील नफ्यात वाढ होईल.
शुभरंग: जांभळा
सिंह (LEO – Saturday, February 12, 2022)
आज चांगली संधी हाती येण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रातील कामात वाढ होईल. नव्या कल्पना सुचू शकतात. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. शारीरिक तंदुरुस्तीदासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता आहे.
शुभरंग: पांढरा
कन्या (VIRGO – Saturday, February 12, 2022)
आहारात तेलकट पदार्थ टाळा. कुटुंबात भावंडांचे निर्णयही विचारात घ्यावे लागतील. तुमच्या कामाला दाद मिळण्याची शक्यता आहे. आज स्वत:करिता बराच वेळ मिळेल. मिळालेल पुस्तके वाचण्यात किंवा आवडते काम करण्यात घालवाल.
शुभरंग: राखाडी
तूळ (LIBRA – Saturday, February 12, 2022)
नवीन लक्ष्य साधण्यासाठी आजचा दिवस तुमच्याकरिता शुभ आहे. उत्पन्न वाढेल. जुनी देणी वसूल कराल. जोडीदार तुमच्यावर खूश असेल. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. आरोग्य चांगले राहिल.
शुभरंग: मोरपिसी
वृश्चिक ( SCORPIO – Saturday, February 12, 2022)
आहारात बदामाचा वापर करा. दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीमुळे चांगला नफा मिळेल. आर्थिक फायद्यामुळे पैशाची चिंता दूर होईल. थंड डोक्याने काम करा. नव्या योजनेवर विचार कराल. आवडत्या देवस्थानाला भेट द्या. ठरवलेली कामे पूर्ण होतील.
शुभरंग: पोपटी
धनु (SAGITTARIUS – Saturday, February 12, 2022)
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. परिस्थिती अनुकूल असेल. जुन्या मित्रमंडळींची भेट होईल. उत्साह वाढेल. कामाबाबत काही नवे करार होण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण असेल. प्रिय व्यक्तिला भेटवस्तू द्या.
शुभरंग: आकाशी
मकर ( CAPRICORN – Saturday, February 12, 2022)
वेळेचा सदुपयोग कराल. सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी कराल. व्यवसायानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. आज तुम्ही मनात ठरवलेली सर्व कामे पूर्ण होतील.
शुभरंग: निळा
कुंभ (AQUARIUS – Saturday, February 12, 2022)
कामाचे कौतुक होईल. प्रवासाचे योग आहेत. तब्येत सांभाळा. सकाळी सूर्योपासना करा. आरोग्य चांगले राहिल. जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. घरातील मोठ्या व्यक्तिंमुळे मनोधैर्य वाढायला मदत होईल. नैमित्तिक कामकाजात वाढ होण्याची शक्यता आहे.
शुभरंग: हिरवा
मीन (PISCES – Saturday, February 12, 2022)
प्रिय व्यक्तिचा मूड घालवू नका. धनलाभाची शक्यता आहे. आजचा दिवस शुभ आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. करमणूक किंवा मनोरंजनासाठी पैसे खर्च कराल. रात्री झोपताना उशाजवळ तांब्या-भांडे ठेवा.
शुभरंग: खाकी


























































