Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’16 जानेवारी’चे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – MONDAY, January 16, 2023)

आजचा दिवस अतिशय आनंदात जाईल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. मनातील ईच्छ होतील. गणपती अथर्वशीर्षाचे वाचन करा. घरात तीन मोरपिसे आणून ठेवा. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील.

.शुभरंग : आकाशी

वृषभ (TAURUS – MONDAY, January 16, 2023)

.भीमरुपी स्तोत्र वाचा. आताचा काळ प्रगतीकडे नेणारा आहे. अडथळ्यांवर मात करायचीच आहे, हे लक्षात ठेवा. घरातील मोठ्या व्यक्तिंची काळजी घ्या. कोणाचेही मन दुखावेल असे बोलणे मनाला लावून घेऊ नका.
शुभरंग : केशरी

मिथुन (GEMINI – MONDAY, January 16, 2023)

.सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित चौकशी केल्यानंतरच पुढचे पाऊल टाका. नवीन वास्तू घेण्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : खाकी

कर्क (CANCER – MONDAY, January 16, 2023)

काळभैरवाचे दर्शन घ्या. प्रत्येक गोष्टीत अतिविचार करणे टाळा. परसात आवडते फुलझाड लावा. दारात दररोज रांगोळी काढा. एखादी चांगली बातमी अनपेक्षितपणे कानी येण्याची शक्यता आहे. समाजात कौतुक होईल.
शुभरंग : राखाडी

सिंह (LEO – MONDAY, January 16, 2023)
दत्त महाराजांचे स्मरण करा. दिवसाची सुरुवात आनंददायी होईल. रखडलेल्या गोष्टी मार्गी लागतील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस लाभदायक आहे. घरातील लहान मुलांचे कौतुक कराल.

.शुभरंग :  काळा

कन्या (VIRGO MONDAY, January 16, 2023)
.नवग्रह स्तोत्राचे वाचन करा. पारिजातकाच्या झाडाला पाणी घाला. आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहवर्धक आहे. कार्यालयात नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. परिस्थिती बदलली तरीही मन शांत कसे राहिल, याचा विचार करा. नारिंगी रंगाचे कपडे परिधान करा.
शुभरंग : खाकी

तूळ (TULA- MONDAY, January 16, 2023)

.चंचल मनाला स्थिर करण्यासाठी ध्यानधारणा करावी लागेल. सकारात्मक विचार करा. मैत्रीत इतरांचे गुण आणि दोष दोन्ही स्वीकारावे लागतात, याचा प्रत्यय येईल. तुळशीला सकाळी पाणी घाला. मनासारखी गोष्ट घडण्याची शक्यता आहे.
शुभरंग : पिवळा

वृश्चिक ( SCORPIO – MONDAY, January 16, 2023)

महालक्ष्मीदेवीचे दर्शन घ्या.काटकसरीने पैसे खर्च करावे लागतील. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना राबवाल. घरात रोज धूप करा. कुटुंबियांसाठी वेळ काढावा लागेल. लोकं तुमच्यातील गुणांचे कौतुक करतील.
शुभरंग : पांढरा

धनु (SAGITTARIUS – MONDAY, January 16, 2023)

श्रीकृष्णाचे दर्शन घ्या. जोडीदाराकडून कौतुक होईल. योग्य व्यक्तिकडे मन मोकळे कराल. आरोग्याची काळजी घ्या. घरी अनपेक्षितपणे आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार यथायोग्य करा. पांढरा पोषाख परिधान कराल.
.शुभरंग : पांढरा

मकर ( CAPRICORN – MONDAY, January 16, 2023)

 आजचा दिवस कितीही त्रासात गेला तरी कुठून तरी मदत मिळेलच. उगाचच डोक्याला त्रास करून घेऊ नका. कलेतील कौशल्यात वाढ होईल. मारुतीरायाचे दर्शन घ्या.

.शुभरंग  सोनेरी

कुंभ (AQUARIUS – MONDAY, January 16, 2023)
.शनीस्तोत्राचे वाचन करा. आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहवर्धक आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मनाविरुद्ध घडले तरीही काळजी करत बसू नका. श्रीरामाचे दर्शन घ्या.
शुभरंग : सोनेरी

मीन (PISCES – MONDAY, January 16, 2023)

आजचा दिवस आपल्यासाठी आनंददायी आहे. भविष्यातील नियोजनाकडे लक्ष द्या. गुंतवणुकीकडे लक्ष द्या. विष्णुसहस्त्रनामाचे वाचन करा. आपली आवडती व्यक्ती आज आपल्याला भेटायला येईल.
शुभरंग : चंदेरी