‘डान्स दिवाने 3’च्या सेटवर कोरोनाचा कहर, स्पर्धकांनंतर 18 क्रू-मेंबर आणि जज पॉझिटिव्ह

रियालिटी टीव्ही शो ‘डान्स दिवाने 3’च्या सेटवर कोरोनाचा कहर दिसत असून स्पर्धकानंतर आता सेटवरील 18 क्रू मेंबर्स आणि जज धर्मेश येलांदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. शो मधील दुसरे जज माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

दरम्यान, कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर धर्मेश गोव्यातील आपल्या घरी क्वारंटाईन आहे. ‘डान्स दिवाने 3’चे प्रोड्यूसर अरविंद राव यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. तसेच शो मध्ये धर्मेशच्या जागी पुढील काही दिवस कोरियोग्राफर शक्ती मोहन आणि पुनित जे पाठक हे जज म्हणून दिसणार आहेत, असेही अरविंद राव यांनी सांगितले.

‘मी भरकटलो होतो, पण अल्लाहचा फर्मान आला’, म्हणत आणखी एका कलाकाराने बॉलिवूड सोडले

याबाबत माहिती देताना अरविंद राव यांनी सांगितले की, धर्मेशची गेल्या आठवड्यामध्ये करण्यात आलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. यानंतर तो गोव्यातील आपल्या घराची डागडुजी करण्याच्या कामासाठी गेला होता. 5 एप्रिलला तो चित्रिकरणासाठी येणार होता. चित्रिकरणापूर्वी सर्वांची कोरोना चाचणी करणे आवश्यत होतो. धर्मेशनेही गोव्यामध्ये कोरोना चाचणी केली. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्याच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आङेत, असेही अरविंद राव यांनी सांगितले.

कोरोनाची लस घेण्याआधी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका, तज्ञांचा इशारा

माधुरी, तुषारचा अहवाल निगेटिव्ह

दरम्यान, कोरोना चाचणी केल्याशिवाय कोणालाही सेटवर येण्याची परवानगी नसल्याचे अरविंद राव यांनी सांगितले. नियमानुसार माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया यांचीही चाचणी करण्यात आली. दोघांची चाचणी निगेटिव्ह आली आहे, असेही ते म्हणाले.

… तरच सेटवर जाणार

दरम्यान, अरविंद राव यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सध्या ते यातून बरे होत असून तीन दिवसानंतर पुन्हा एकदा चाचणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अहवालस निगेटिव्ह आला तर पुन्हा सेटवर जाणार असल्याचे ते म्हणाले. तसेच ज्या क्रू मेंबरचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे ते म्हणाले.

CDC चा अहवाल; ‘या’ तीन प्रकारच्या लोकांवर कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स जास्त, जाणून घ्या

आपली प्रतिक्रिया द्या