दापोली-मंडणगड-खेड-मुंबईस्थित शिवसैनिकांचा आज मेळावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातील मुंबईवासीय निष्ठावान शिवसैनिकांचा भव्य मेळावा उद्या शनिवार, 16 जुलै रोजी दादर येथील छबिलदास शाळेत आयोजित केला आहे. शिवसैनिकांच्या भव्य मेळाव्यात शिवसेना नेते अनंत गीते यांच्यासह दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी तसेच रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

दापोली, मंडणगड आणि खेड या तालुक्यातील नोकरी-व्यवसाय, उद्योगधंद्यानिमित्त मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, वसई, विरार, नालासोपारा, भाईंदर, मीरा रोड, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आदी ठिकाणी वास्तव्य असणाऱया शिवसैनिकांचा भव्य मेळावा दादर येथील छबिलदास शाळेत उद्या शनिवार, 16 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित केलेला आहे.

या मेळाव्यासाठी दापोली, मंडणगड, खेडमधील हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहणार असून आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहोत, आम्ही फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेच आदेश मानतो हे उपस्थितीने बंडोबांना दाखवून देणार असल्याची माहिती माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी दिली.